डोंबिवली : भारतीय संस्कृतीत रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीतील अतुट प्रेमाचं प्रतिक म्हटलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण ही भाऊरायाला मनोभावे ओवाळून त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ईश्वरास प्रार्थना करते. भाऊ पण तिला नतमस्तक होऊन प्रणाम करतो व तिला एकप्रकारे रक्षणाची हमीच देत असतो. अशा पवित्र सणाचे हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असून तमाम नागरिकांना मी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रातःकाळी आगरी कोळी बंधु-भगिनी समुद्रात नारळ वाहत पुजा करुन कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच समुद्रदेवतेस आपल्या सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करतात. नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी कोळी बंधु-भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देते अशा भावना महापौरांनी आपल्या संदेशात व्यक्त केल्या आहेत. उपमहापौर उपेक्षा भोईर आणि महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनीही नागरिकांना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधननिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.