मुंबई, (निसार अली) : नारळी पौर्णिमेनिमित्त भायखळा येथील खटाव मिल नाका येथे नारळ फोडण्याच्या स्पर्धेचे शिवसेनेने आयोजन केले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन नारळ फोडले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक नारळ आपटून फोडला जातो त्यामध्ये ज्याचा नारळ शेवटपर्यंत राहतो तो स्पर्धक विजयी होतो. या स्पर्धेमध्ये 4000 पेक्षा जास्त नारळ फोडण्यात आले. या स्पर्धेमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी सुद्धा आवर्जून सहभाग घेतला होता. ज्येष्ठ नागरिक यांनी देखील या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक परेश कुवेसकर यांनी मिळाले तर दुसरे पारितोषिक राकेश परदेशी यांनी पटकावले. मराठी संस्कृती आणि परंपरा टिकांवण्यासाठी आम्ही दरवर्षी नारळी पौंर्णिमेनिमित्त नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित करतो . गेल्या वर्षी 2000 नारळ फोडण्यात आले होते. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन तो आकडा 4000 पर्यंत गेला आहे. पुढच्या वर्षी हि ह्यात आणखी वाढ होईल अशी माहिती आयोजक रोहित रहाटे यांनी दिली.