![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/07/coco.jpg)
प्रातींनिधिक
मुंबई : झाडावरील नारळ डोक्यात पडून पाच वर्षाच्या दोन बालिका जखमी झाल्याची घटना घाटकोपरमधील रमाबाई नगरमध्ये घडली. फराह सलीम सय्यद आणि प्रणाली अनिल मोरे अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्या जॉयमॅक्स शाळेत सिनियर केजीला शिकत आहेत.
या प्रकरणी नारळाच्या झाडाचा मालक सुरेश पुजारी (३५) याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये नारळाचे झाड पडून एक महिला मृत्युमुखी पडली होती. ठाण्यातही एका वकिलाचा झाड अंगावर कोसळून मृत्यू झाला होता.