
संग्रहित फोटो
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : भू माफियांनी जमिन खरेदी केल्याचा आरोप झालेल्या नाणार इथल्या प्रस्तावित आॅईल रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन खरेदी विक्रीची आता चौकशी होणार आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार पंचक्रोशीत आशिया खंडातील सर्वात मोठा आईल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. नाणार परिसरातील १४ गावांचा या प्रकल्पाला प्रखर विरोध आहे. तर इथल्या जमिनी सरकारी मोबदला अधिक मिळवण्यासाठी दलालांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून कवडीमोल भावांनी विक्री केल्या गेल्या. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर गुजरातच्या लॅण्ड माफीयांनी इथं जमिन खरेदी केल्याचा आरोप शिवसेनेनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून या प्रकरणाची तक्रार थेट कोकण आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानुसार कोकण आयुक्तांनी रिफानरी प्रकल्पासाठी प्रस्तावित जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील चौकशी करण्याच्या सुचना कोकण आयुक्तांनी केल्यात. त्यामुळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना फसवून दलालांनी आपले उखळ पांढरे केले आहे का हे उघड होण्यासा मदत होईल.