रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील नाणारा परिसरात होणार्या प्रेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन पेटले असून त्याची झलक आज पाहायला मिळाली. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जाळून टाकली, शिवसेना आणि काँग्रेसेही सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाली होती.
नाणारच्या चौकात आंदोलन केले गेले. प्रकल्पामुळे बाधीत होणार्या १४ गावांतील ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठवता प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संप या ठिकाणी झाला. उद्याही आंदोलन होणार आहे. चौदाही गावातील शाळा ओस पडल्या होत्या. शाळेचा आज पहिला दिवस होता. परंतु, एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. दोन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे ग्रामस्थ विस्थापीत होणार आहेत. आंब्यांच्या बागा प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहेत. जमिनी जाणार असल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत.