वाशिष्टी मिल्क अँड प्रॉडक्टच्या ईटीपी प्लांटचे मान्यवरांच्या हस्ते थाटात भूमिपूजन
रत्नागिरी, प्रतिनिधी : कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव विशेष म्हणजे सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी व्यवस्था उभी राहात आहे. कोकणामध्ये या पद्धतीची हिम्मत करण्याची भूमिका कोणी दाखवली नाही. ही या तिघांनी दाखवली असून या तिघांना सलाम करतो, तुमच्या हिमतीला दाद देतो, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ईटीपी प्लांट भूमिपूजन समारंभ प्रसंगी या तिघांचे भरभरून कौतुक केले.
वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ईटीपी प्लांट चे भूमिपूजन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चिपळूण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, वाशिष्टी मिल्क प्रोडक्टचे प्रमुख व चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, आमदार शेखर निकम, संचालिका स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव आदींच्या उपस्थितीत थाटामाटात भूमिपूजन झाले.
निसर्गाने कोकणाला भरपूर दिले आहे. पण निसर्गाचा वापर आपण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी योग्य पध्दतीने केला असता तर आम्हाला मुंबईला नोकरी-धंद्यासाठी जावे लागले नसते.कोकणात भरपूर पाऊस पडत आहे. पण सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळत आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील निसर्ग बघण्यासाठी जगातून लोकं येतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही समुद्रामध्ये आहेत. ते देशातल्या कुठल्याही समुद्रात नाही. या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं असतं तर आपल्याला वाटते की, रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकांना मुंबईत काम करायला जायची गरज पडली नसती.कोकणातील नैसर्गिक व्यवस्थेला जोडून व्यवस्था उभी करायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये आम्ही मागं पडलो, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणात डेअरी प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही. दुग्ध व्यवसायात शेतकरी मागे पडला. यात काही कारणे असतील. मात्र, आता येथील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव आणि विशेष करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी व्यवस्था निर्माण होत आहे. कोकणामध्ये या पद्धतीची हिम्मत करण्याची भूमिका कोणी दाखवली नाही. ही सुभाष चव्हाण, प्रशांत तसेच स्वप्ना या तिघांनी दाखवली आहे. याबद्दल तुम्हा तिघांना सलाम करतो, तुमच्या हिमतीला दाद देतो, अशा शब्दांत नाना पटोले यांनी या तिघांचे भरभरून कौतुक केले.
तुम्हाला लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे. लोक आणखी आर्थिक सक्षम व्हावेत हे जे स्वप्न बघून आपण हे काम करत आहात, याबद्दल तुमचे कौतुक असून यामध्ये तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल, अशी अपेक्षा यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, कोकणातील लोक मुंबईत मोठी झाली. पण जो गावात राहिला तो मागेच पडला. कोकणातला माणूस मुंबईमध्ये येऊन आपली गती करायला लागला आणि तिथे गेल्यानंतर आमदार, नगरसेवक होतात. पण आता इथल्या भागाचा विकास झपाट्याने होईल असा आपला विश्वास आहे, असे मत मांडले.
ते आणखी पुढे म्हणाले की, २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार म्हणून खासदार म्हणून काम करतो आहे. विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष असतांना कोकण विकासासाठी पॅकेज दिले गेलं होतं. मात्र, कोकणाचा विकास झाला नाही. या पार्श्वभूमीवर कोकणाला जवळून पाहिलं आणि कोकणाच्या अडचणीमुळे होत्या त्या अडचणी आपल्या लक्षात आल्या होत्या. पण मी तुम्हाला सांगतो की, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळ लागतो आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या हातांनी घडल्या असत्या तर आतापर्यंत कोकणाचा विकास झाला असता त्याला कोणाच्या तरी हाताने करून घ्यायचं असेल, असे आपले मत मांडले. त्यावेळी आमचे गुरू विलासराव देशमुख राजकारणामध्ये नेहमी म्हणायचे की नशिबा अगोदर जास्त काही मिळत नाही आणि म्हणून आता मला असं वाटतं की आता ही वेळ कोकणासाठी आलेली आहे. आणि कोकणाच्या विकासासाठी जे काही स्वप्नं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिले आहे. यामुळे कोकणात नक्कीच बदल झालेला पहावयास मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.
कोकणाच्या संपूर्ण भागांमध्ये ७२० किलोमीटरचा समुद्र लाभला आहे. इतका समुद्र देशात कुठेही नाही. मात्र, अन्यत्र छोट्या छोट्या समुद्रकिनाऱ्यावर तेथील लोकांनी रोजगार आणि व्यवस्था उभी केलेली पाहिली तर तेथे बदल झालेला पहावयास मिळत आहे. मराठवाड्यात गेला तर तिकडे अजिंठ्याची लेणी त्या पाहण्यासाठी परदेशातून लोकं येतात. कोकण विभाग असेल मुंबई जगाची आवडती नगरी आहे. कोकणचा विकास झाला असता तर असं वाटतं की आपल्या कोणालाही आपलं गाव सोडून बाहेर जायची इच्छा नसते पण पोटासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं. कोकणातील माणूस हौसेने मुंबईला जात नाही. त्याला पर्याय नाही म्हणून तो जातो. महाराष्ट्रात प्रत्येक भागामध्ये निसर्गाने जे काही दिले आहे तिथे व्यवस्था उभ्या करण्यात आपण कमी पडलो आणि म्हणूनच आमचा भाग मागासलेला भाग आहे असे आपण म्हणतो आहे. सुरुवातीला प्रशांतजीनी सांगितलं की, हा मागासलेला भाग आहे. पण मागासलेली नाही तर थोडे विचाराने मागासलेले आहोत. भविष्यामध्ये याच्यामध्ये एक मोठा आपण बदल घडवून आणू आणि मी तुम्हाला सांगतो की दुग्ध व्यवसाय आज एक लाखाच्या हिशोबाने उभा करीत आहात. मला वाटते की, प्रशांतजी हा प्रकल्प कमी पडेल. मोठा प्रकल्प उभा केला पाहिजे. कोकणामध्ये दुधाला एकदा काही ‘स्कोप’ मिळाला तर मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय आपल्या या जिल्ह्यामध्ये उभा राहण्यास फार वेळ लागणार नाही. शासनाकडून जी काही मदत आपल्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि आपल्या या हिमतीला अजून काही मदत देण्याची काही लागलं तर मी तुम्हाला सांगतो शासनाकडून सगळी मदत मिळवून देण्याचे काम आमदार शेखर निकम असतील, ती आम्ही मिळून करून देऊ, अशी ग्वाही यावेळी पटोले यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात तीन ते चार वेळा दौरा केला महापूर असो अथवा वादळ असो या प्रसंगी येथील लोकांच्या भावना जाणून घेतल्या. आता रत्नागिरी दौऱ्यावर असताना मच्छीमारांचे प्रश्न समोर आले आहेत. चिपळूण शहरातील गाळाचा विषय देखील आपल्या समोर आला आहे. गाळ काढण्याचे काम २४ तास केले जात आहे असे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही अशी तक्रार आपल्याकडे आली आहे. त्यात लक्ष घातले शैलेश शिवाय भविष्यात पूर येणार नाही या दृष्टीने काही उपाययोजना आखाव्या लागतील तसे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात. आमचा निसर्ग आणि कायम रहावा या सगळ्या गोष्टींचे पालन करूनच आपण पुढच्या काळामध्ये पुढे जाण्याचा एक संकल्प सुद्धा या ठिकाणी करूया, असे शेवटी आवाहन केले.
*कोकणवासीयांसाठी हा दुग्ध प्रकल्प महत्त्वाचा-सुनील केदार*
यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाली की, तुम्ही हा प्रकल्प उभा करता आहात, कोकणवासीयांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून हे पाऊल विकासाच्या दृष्टीने नक्कीच सिद्ध होईल, असा विश्वास श्री केदार यांनी यावेळी व्यक्त केला. निसर्गाने भरभरुन दिलेल्या कोकणामध्ये माणूस कोकणी मेहनती आहे. ह्या कोकणी माणसाने एकदा कष्ट करायचे ठरवले की तो मागे वळून कधीच पाहत नाही. या प्रकल्पासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.
*वाशिष्टी मिल्क प्रॉडक्ट्स च्या माध्यमातून कोकणात समृद्धी आणूया- सुभाष चव्हाण*
चिपळूण नागरी चे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण या कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले की, पाच महिन्यापूर्वी आपण या प्रकल्पाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती पाहता प्रकल्पाला आपण किती मनापासून साथ देतात त्याचे ज्वलंत उदाहरण आहे आणि आपल्याला खात्री आहे की पुढच्या वाटचालीत आपला याच्यात मोलाचा सहभाग असेल असे मी आपल्याकडून अपेक्षित करतो आणि मला ती खात्री आहे, अशी अपेक्षा सुभाष चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांकडे व्यक्त केली. आता गेल्या सहकारातील ५० वर्षांच्या कालखंडात पाहिलं तर स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या कालावधीत दुग्ध प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न झाले मात्र काही अडचणींमुळे ते प्रकल्प यशस्वी होऊ शकले नाहीत, याची खंत आपल्या मनात होती. आपल्याला सातत्याने वाटायचं की, त्याचा शेतकऱ्याला दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम आपण करू शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक काम केलं पाहिजे अशी माझी सातत्याने मनापासूनची भावना होती. इथला शेतकरी आहे तो खऱ्या अर्थाने आर्थिक मागास, उत्पन्नाचं साधन नाही जर त्याच्या कुटुंबातला कोणी कमवता नसेल तर उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते अशा पद्धतीचं सर्वसामान्य वातावरण आहे. अशा परिस्थितीत त्याने दोन म्हशी, गाई सांभाळल्या तर त्याचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, अशी आपली भावना आहे. शासनाने पतसंस्थांना कृषी आणि कृषिपूरक व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्याची परवानगी दिली यानंतर संस्थेच्या माध्यमातून ५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्यात आला आहे. आता हा शेतकरी ५०-६० लिटर दूध उत्पादन करतो आहे.
सहकारातून आर्थिक सक्षम होऊ शकू. आपल्या सगळ्यांच्या साथीने हे काम पुढे नेता येईल, ही आपली भावना आहे.
या प्रकल्पात सहभागी व्हा. हा आपला सहकारी तत्त्वावर हा प्रकल्प आहे आणि आपल्याला पुढे नेऊन कोकणात समृद्धी आणायची आहे. आणि तुम्ही सर्वजण साथ द्याल अशी अपेक्षा सुभाष चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
*वाशिष्टी मिल्क प्रकल्पात शेतकऱ्यांनी सहभागी होणे गरजेचे- आमदार शेखर निकम*
आमदार शेखर निकम यावेळी म्हणाले की, चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी धाडसी पाऊल टाकले आहे. कोकणात सहकार रुजत नाही, असा आक्षेप नेहमीच प्रत्येक जण घेत असतो. परंतु चव्हाण साहेबांनी सांगितलं की स्वर्गीय निकम साहेबांनी हे सगळे प्रयोग त्या- त्या वेळी खूप कष्टाने प्रयत्ने केले होते. परंतु तितकेसे यश आले नाही.आमच्याकडे एखाद्याने व्यवसाय केला आणि तो यशस्वी झाला तर त्याच्याकडे सर्वांचं लक्ष जातं. परंतु एकदा हा प्रकल्प उभा राहिला आणि त्यातून आपल्याला पैसे मिळतात ही भावना झाली की, टप्प्याटप्प्याने अनेक लोक पुढे येतील. आजही आमच्याकडचे कष्ट करणारे लोक धंदा चांगल्या पद्धतीने सांभाळतात. दूध देखील चांगल्या पद्धतीने काढतात. पण आमचा खरा प्रश्न काय असेल तर तो मार्केटिंगचा प्रश्न. वाशिष्टी मिल्क मिल्क प्रोडक्ट कंपनीच्या रूपाने हा प्रश्न मार्गी लागणार आहे. तरी आता मोठ्या प्रमाणात या सगळ्यामध्ये आपण सहभागी होणे गरजेचे असे आवाहन शेखर निकम यांनी यावेळी केले. तर ते पुढे म्हणाले की,
इथे बर्यापैकी दूध तयार होतं. आम्हाला गोकुळवर आम्हाला बऱ्याच वेळा अवलंबून रहावं लागतं. गाडी पाठवा असे सांगावे लागते आणि मग कधीतरी गाडी यायला उशीर होतो आणि मग तिकडून रिपोर्ट येतो की तुमचं एवढे दूध नासलं आणि मग त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होतं. पण या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे आता नुकसान होणार नाही. या प्रकल्पासाठी सर्वांचे आशीर्वाद मिळत असल्याने हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाशिष्टी मिल्क प्रॉडक्ट्सचे प्रमुख व चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले. या कार्यक्रमाला चिपळूण नागरी चे व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले व सर्व संचालक तसेच राष्ट्रवादीचे नेते बाळकृष्ण साळवी, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी काँग्रेसच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, सफा गोठे, अश्विनी भुस्कुटे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, युवकचे गुलजार कुरवले, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, चिपळूण नागरी चे प्रशांत वाजे, महेश खेतले, अविनाश गुढेकर आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक बेंद्रे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत यादव चिपळूण नागरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.