मुंबई : भाजपाचे खासदार नाना पटोले शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्षांकडे नाना पटोले यांनी राजीनामा सोपवला आहे.
विदर्भातील ओबीसींचे नेते अशी पटोले यांची ओळख आहे. २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते तेथे त्यांचे पक्षनेत्यांशी व विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. मात्र अलीकडे ते स्वपक्षाच्या धोरणांवर नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर देखील त्यांनी सातत्याने उघडपणे टीका केली होती. यात दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि त्यामुळेच पटाेले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.