डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कै. नामदेव सुक-या म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गावदेवी मित्र मंडळ व शिवसेना विभागीय शाखा क्र. 15 कोपर रोड माध्यमातून भव्य अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात झाला. माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाने उभारलेल्या कोपर रोड येथील मैदानात अंडरआर्म स्पर्धा आयोजित केली आहे. गुरुवारी याप्रसंगी सामन्यांचे आयोजक मनोज म्हात्रे, प्रविण म्हात्रे, विशाल म्हात्रे, शिवसेना उपशहरप्रमुख किशोर मानकामे, महिला विभागप्रमुख हिराबेन वाघेला, उपशाखाप्रमुख कल्पना किरंगे, गटप्रमुख सुरेखा कनोजिया, शिवसैनिक, सामन्यांचे व्यवस्थापक व प्रेक्षक उपस्थित होते.
गावदेवी मित्र मंडळ आयोजित केलेल्या मर्यादित षटकांचे अंडर आर्म सामन्यांचे हे पाचवे वर्ष आहे. ग्रामीण, शहरी व खुल्या गटात एकूण मिळून 80 संघ या सामन्यात सहभागी झाले आहेत. पाच दिवस हे सामने सुरु राहणार प्रत्येक दिवशी 16 संघ लढत देणार आहेत. 25 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम सामने पार पडणार आहेत. अंतिम सामन्यातील विजते संघास 99,999 रोख व कै. नामदेव सुक-या म्हात्रे चषक तसेच उपविजेता संघास 55,555 रोख व चषक आणि तिसऱ्या संघास 22,222 रोख व चषक देण्यात येणार आहेत. संपूर्ण सामन्यातील मालिकावीरचा बहुमान पटकाविणा-या खेळाडूस आकर्षक बाईकचा मानकरी ठरेल.
या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षकास बँट व मोबाईल भेट दिला जाईल असे आयोजक मनोज रमेश म्हात्रे यांनी सांगितले. सध्या सोप्या मराठी भाषेत सामन्यांचे खुमासदार समालोचन प्रसाद परब, नितीन काळण, व स्वप्नील सावंत करणार आहेत तर पद्मनाभन प्रभू, अजित निकम, भालचंद्र म्हात्रे व विनोद शर्मा हे पंच म्हणून कामगिरी पार पडणार आहेत. विशेष म्हणजे सामन्यांचे लोकल वाहिन्या आणि यु ट्यूब वर प्रेक्षेपण करण्यात येत आहे. कोपर मैदानावर क्रिकेटप्रेमी डोंबिवलीकरांनी गर्दी केली असून कोण चषक पटवणार याच्या पैजा मारल्या जात आहेत. अंतिम सामान्यासाठी व बक्षिक समारंभास खा.डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांगडे, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शहरप्रमुक राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मनोज म्हात्रे यांनी दिली.