13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यकमांचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे पाडावेवाडी येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी यांच्यावतीने 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांसह माघी गणेशोत्सव मंडळ आणि कोकण नमन कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सायं. 4 ते 8 वा. श्रींचे आगमन होणार आहे. त्यानिमित्त या उत्सवादरम्यान दररोज सायं. 7.00 वा. श्रींची आरती कार्यकम होणार आहे. मंगळवार 13 फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी स.9 वा. श्रींची पतिष्ठापना, सायं. 4.00 वा. महिलांचे हळदीपुंकू, सायं. 7.30 ते 8.30 वा. भजन : लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे, रात्रौ 9.20 वा. जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे उद्घाटन रात्रौ 9.30 वा. श्री आई भवानी नमन मंडळ निवे बु. देवरुख, रात्रौ 11.30 वा. जय भैरी नमन मंडळ, ओरपेवाडी, लाजुळ यांचा नमन कार्यकम.
बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सायं. 7.30 ते 8.30 वा. भजन: महिला मंडळ कलामंच मिरजोळे, रात्रौ 9.30 वा. जय हनुमान नमन मंडळ आगरनळ, रात्रौ 11.30 वा. स्वयंभू महालक्ष्मी नमन मंडळ, कोतवडे यांचा नमन कार्यकम. गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सायं. 7.30 ते 8.30 वा. भजन वरचीवाडी मिरजोळे, रात्रौ 9.30 वा. श्रीराम नमन मंडळ, कामथे हुमनेवाडी, चिपळूण, रात्रौ. 11.30 वा. भैरवनाथ नमन मंडळ रानपाट यांचा नमन कार्यकम.,
शुकवार दि. 16 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. रक्तदान व आरोग्य शिबिर, सायं. 7.30 ते 8.30 वा. भजन-मधलीवाडी, मिरजोळे, रात्रौ. 9.30 वा. आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ सनगरेवाडी, हातखंबा. रात्रौ. 11.30 वा. वाघजाई नवतरूण फणसवळे यांचा नमन कार्यकम. शनिवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सायं. 7.30 ते 8.30 वा. भजन: संबा रवळनाथ भजन मंडळ, खानू, रात्रौ 9.30 वा. जुगाई नमन मंडळ, पानवल., रात्रौ. 11.30 वा. रवळनाथ रिमिक्स लयभारी नमन मंडळ यांचा नमन कार्यकम होईल.रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी स. 11.00 वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दु. 1.00 ते 3.00 वा. महाप्रसाद, सायं. 7.30 ते 8.30 वा. भजन: कालिकादेवी भजन मंडळ, पाडावेवाडी, रात्रौ 9.30 वा. मान्यवरांचे हस्ते नमन स्पर्धेचे बक्षीस वितरण, रात्रौ 10.30 वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सायं. 4 ते 8 वा. श्रींची विसर्जन मिरवणूकीने या माघीगणेशोत्सवाची सांगता होणार आहे. तरी श्रींच्या दर्शनासह या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.