- साथीच्या काळात ७००हून अधिक व्हर्च्युअल पूजा
- पंडितांची वेळ घेण्यापासून ते गणेशमूर्ती आणि मोदकांपर्यंत, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा पुरविणारे वन स्टॉप सोल्युशन
- कागद व माती, लाल माती आणि पंचगव्यापासून तयार केलेल्या पर्यावरणस्नेही (इको-फ्रेण्डली) मूर्ती
- “माय ओमनमो अॅप” द्वारे गणपती बाप्पाला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर घेऊन जात आहे- अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियातील १००० घरांमध्ये पोहोचणार
- पुजेसाठी किंवा मूर्तीसाठी बुकिंग करा आणि वृद्धाश्रमासाठी असलेल्या ‘१ मील’ उपक्रमात योगदान देऊन माय ओमनमो अॅपच्या ‘माय आजी’ अभियानाला मदत करा
मुंबई, 19 ऑगस्ट : कोव्हिडपूर्व काळ असो किंवा कोव्हिडोत्तर काळ असो, सणासुदीचा हंगाम तर दरवर्षीप्रमाणे आला आहे आणि त्यासोबत एक सकारात्मकताही आली आहे! श्रावणाचा मंगलमास सुरू आहे आणि गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे, दिवाळीही तशी फार लांब नाही. आपण सगळे यासाठी सज्ज होऊ लागलो आहोत, छान सेल्फी काढण्यासाठी आणि मिठाया-मोदकांचा आस्वाद घेण्यासाठी, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रथा-परंपरांसाठी सज्ज होत असताना या कालावधीत होणाऱ्या पवित्र पूजा आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या असतात.
सणासाठी घरात तयारी करत असतानाच, अनेक कुटुंबांना अगदी शेवटच्या क्षणी पूजा सांगणाऱ्या गुरूजींची वेळ घेण्याची गरज पडू शकते किंवा पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजबजलेल्या बाजारातून वाट काढत जाणे त्यांच्यासाठी जिकिरीचे असेल किंवा गणपतीबाप्पाची इको-फ्रेण्डली मूर्ती कुठे मिळेल याबद्दल निश्चित माहिती नसेल. सध्याच्या काळात माय ओमनमो हे मुंबईस्थित स्पिरिच्युअल अॅप तुमच्या मदतीला धावून येऊ शकते. केवळ देशांतर्गत बाजारपेठेतीलच नव्हे तर जगभरातील भाविकांच्या अध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्याच्या प्रामाणिक हेतूने माय ओमनमो हे व्हेंचर २०१७ मध्ये सुरू झाले. माय ओमनमो हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, तो ऑनलाइन/ऑफलाइन पूजा पॅकेजेस, पंडित बुकिंग सेवा, मंदिरात दर्शनाची बुकिंग्ज, गणेश मूर्ती,मोदक, पूजा सामग्री आणि अगदी शेवटच्या मिनिटाला मूर्ती बुक करणे आणि इतर अनेक सेवा सर्व एकाच क्लिकमध्ये “माय ओमनमो अँप” वर उपलब्ध आहे. माय ओमनमो गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकते.
भारताच्या मातीतून उगवलेल्या आणि सर्वांच्या लाडक्या गणपतीबाप्पाला एका क्लिकद्वारे जगभर नेणाऱ्या माय ओमनमो या अध्यात्मिक मोबाइल अॅपचे संस्थापक मकरंद पाटील सांगतात, “आमच्या ‘माय ओमनमो संपूर्ण गणेश पूजा किट’मध्ये गणपती बाप्पाच्या ६८ प्रकारच्या मूर्ती आहेत, कागदी मखराची (सजावटीसाठी) ३५ वेगवेगळी डिझाइन्स आहेत, पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणांसह पूजा सामुग्री किट आहे. थर्माकोलवर बंदी आल्यामुळे आम्ही रिसायकल्ड साहित्य व नैसर्गिक रंगांपासून तयार केलेले पर्यावरणपूरक मखर आणि अन्य सजावटीचे साहित्य पुरवतो. पर्यावरणाबद्दल जागरूक कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.” ‘माय ओमनमो संपूर्ण गणेश पूजा किट’ गेल्या २ वर्षांत अमेरिका, यूएई आणि ऑस्ट्रेलियातील १०००हून अधिक घरांमध्ये पोहोचले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाचे वर्षसुद्धा याला अपवाद नाही. “भारतातील तसेच परदेशातील ग्राहकांनी माय ओमनमोवर विश्वास ठेवला आहे आणि आम्ही आतापर्यंत मूर्ती, पूजा साहित्य आणि मखराचा समावेश असलेली ६५० किट्स निर्यात केली आहेत. यंदाही सुमारे १००० घरांत पोहोचता येईल अशी आशा आम्हाला वाटते. आणि आता आगामी गणेशोत्सवात आम्ही यूके, कॅनडा व मलेशियातही गणेश प्रतिष्ठापना पुजेसाठी बुकिंग्ज घेत आहोत”
या वर्षी गणेशोत्सव पॅकेज घरपोच देण्यावर अधिक भर आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, ताजी फुले आणि दुर्वांसह गणेश स्थापनेसाठी आवश्यक ते संपूर्ण पूजासाहित्य, ऑनलाइन/ऑफलाइन पुरोहित सेवा आणि आरोग्याची काळजी घेऊन केलेले उकडीचे मोदक असे हे पॅकेज आहे. आमच्या बेसिक पॅकेजची किंमत ४५०१ रुपयांपासून सुरू होते,” असे ते पुढे सांगतात. माय ओमनमोच्या मासिक पूजा किट या उत्पादनालाही चांगलीच मागणी आहे. दर महिन्याला ८००० ते १०००० किट्सची विक्री होत आहे. ही मासिक पूजा किट्स देशभरातील महिला बचत गटांकडून तयार करून घेतली जातात. हे गट त्यांच्या छोट्या, सुक्ष्म उद्योगांद्वारे हळद, धूपबत्ती, फुलवाती आदींचा पुरवठा करतात. पूजा सामग्री किटमध्ये ४८ वस्तूंचा समावेश असतो. हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड, गंध, बुक्का, तळवटी, जांजीवजोड, कापसाची वस्त्रे, अबीर, अश्वगंधा, घरगुती पद्धतीने तयार केलेली अगरबत्ती आणि मूलबूत पूजा साहित्याचा यात समावेश असतो. माय ओमनमो अॅपच्या माध्यमातून मोदकांसह सात्त्विक भोजन किंवा महाप्रसादासाठी केटरिंग सेवा देखील देतात..
ही धार्मिक पूजा किट्स आणि मूर्तींची पॅकेजेस तयार करण्यामागील संशोधनाबद्दल ते पुढे सांगतात, “केवळ कागदापासून तयार केलेल्या मूर्ती धर्माच्या दृष्टीने योग्य नाहीत हे १०० टक्के सिद्ध झाले आहे. म्हणूनच माय ओमनमोने शिल्पकारांच्या टीमसोबत काम करून खास इको-फ्रेण्डली मूर्ती घडवल्या आहेत. आमच्या मूर्तींमध्ये ९० टक्के कागद आणि १० टक्के शाडूमातीचा वापर केला जातो. यंदा आम्ही लाल माती आणि पंचगव्य (गोवऱ्या, गाईचे तूप, गोमूत्र, दूध आणि दही) यांपासूनही मूर्ती घडवल्या आहेत.”
या साथीच्या काळात पुरविण्यात येणाऱ्या ऑनलाइन पूजा आणि पंडित/पुरोहित बुकिंग सेवेबद्दल माय ओमनमोचे संस्थापक मकरंद पाटील सांगतात, “लॉकडाउन सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात पुजेसाठी बुकिंग्ज कमी झाली. मग आम्ही व्यवसायाच्या प्रारूपात थोडा बदल करण्याचा निर्णय घेतला आणि गुगल मीट्स, झूम, व्हॉट्सअॅप व्हिडिओ, स्काइप आदींद्वारे ऑनलाइन पुजेवर लक्ष केंद्रित केले. या बदलाचे उत्तम परिणाम दिसले आणि दररोज २ ते ३ पुजांसाठी बुकिंग होऊ लागले. मुख्यत: महामृत्युंजयजप, चंडीपाठ, गणेशपूजा, सत्यनारायणपूजा, रुद्रअभिषेक यांच्यासाठी बुकिंग्ज सुरू झाली. मार्च ते जुलै या काळात आम्ही ७००हून अधिक व्हर्च्युअल पूजा संपन्न केल्या. आता श्रावणपूजा आणि गणेश स्थापना पूजा यांसाठी खूप जण चौकशी करत आहेत. ऑनलाइन पूजा महानगरांमध्ये आणि श्रेणी २ शहरांमध्ये विशेष ट्रेण्डिंग आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद, इंदोर आणि जयपूर या शहरांमधून ऑनलाइन पूजांना मागणी आहे. साथीच्या काळात आम्ही ऑस्ट्रेलिया आणि यूएईमध्येही अनेक ऑनलाइन पूजा संपन्न केल्या.”
यंदा खरेदी केलेल्या प्रत्येक मूर्तीसाठी किंवा बुक केलेल्या प्रत्येक पूजेसाठी ग्राहकाने दिलेल्या शुल्कापैकी १० टक्के रक्कम सीएसआर सपोर्ट म्हणून स्वस्तिक फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील आजी/आजोबांसाठी एक दिवसाचे जेवण प्रायोजित करण्याकरता दिली जाणार आहे. ‘माय आजी’ अभियानात देणगी देणाऱ्यांना माय ओमनमो ई-प्रमाणपत्रे प्रदान करणार आहे.
ही स्टार्ट-अप जलदगतीने वाढत आहे आणि ऑस्ट्रेलिया, अमेरिका, यूएई आणि मलेशियातही यशस्वीरित्या निष्ठावंत ग्राहकवर्ग तयार करत आहे. नजीकच्या भविष्यकाळात आपले कार्यक्षेत्र अन्य देशांतही विस्तारण्याचे उद्दिष्ट माय ओमनमो प्लॅटफॉर्मपुढे आहे.