मुंबई : भारतीय क्रिकेट प्रेमी आता माय११सर्कल या भारतातील एका आघाडीच्या फॅंटसी अॅपवर महान क्रिकेटपटूंशी चढाओढ करू शकतात. या मंचाशी सौरव गांगुलीसह आता शेन वॉटसनदेखील जोडला गेला आहे. डोमेस्टिक ऑस्ट्रेलियन टी२० लीगच्या प्रत्येक सामन्यासाठी शेन वॉटसन स्वतःची टीम बनवेल व अशाप्रकारे माय११सर्कलच्या खेळाडूंना ‘प्ले विथ चॅम्पियन्स’ ही संधी मिळेल व सोबत १ कोटी रु. चे भव्य बक्षिस जिंकण्याचीही संधी मिळेल.
माय११सर्कल “बीट द एक्स्पर्ट” ची घोषणा केल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत चालले आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी स्पर्धा करण्याची संधी मिळणे, हे याच्या वाढत्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण आहे. एक्स्पर्टला हरवून तिप्पट रोख बक्षिस जिंकवून देणा-या दररोजच्या विजयाव्यतिरिक्त डोमेस्टिक ऑस्ट्रेलियन टी२० सिरीजसाठी एक लीडरबोर्ड देखील असेल. लीडरबोर्डवर सर्वोच्च स्थान मिळवणा-या खेळाडूला १ कोटी रु चे भव्य बक्षिस मिळेल. दुसर्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला २० लाख रु व तिस-या क्रमांकाच्या खेळाडूला ५ लाख रु. मिळतील. या टूर्नामेंटमध्ये एकंदर १५००० रोख बक्षिस विजेते असतील.
माय११सर्कलशी आपल्या सहयोगाबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन म्हणाला, “माय११सर्कलशी हातमिळवणी करून या मंचातर्फे चाहत्यांशी संलग्न होताना मला आनंद होत आहे. मला वाटते की, ही खरोखर एक अनोखी संकल्पना आहे, ज्यात क्रिकेटप्रेमी क्रिकेटपटूंसोबत खेळू शकतात. हा अनुभव घेण्यास मी उत्सुक आहे.”
माय११सर्कलचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पंड्या म्हणाले, “माय११सर्कलवर शेन वॉटसनचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. सहभागींची संख्या अफाट वाढते आहे आणि भारताच्या सामान्यांसाठी खेळाडू सौरव गांगुलीशी चढाओढ करत आहेत, तर ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक टी२० सिरीजसाठी शेन वॉटसन सामील झाल्यानंतर खेळ आता आणखीनच रंगतदार होणार आहे. शेन वॉटसनचे सामील होणे हे आमच्या ‘प्ले विथ चॅम्पियन्स’ व्हिजनला अनुसरूनच आहे आणि आम्ही स्वतःची क्षमता वाढवत असताना आमच्या खेळाडूंना असाच आनंद देत राहू.”
















