मुंबई : सन १९९३ साली मुंबईत झालेल्या भयावह साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मुस्तफा डोसा याचा आज हृद्याच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अस्वस्थ वाटत असल्याने त्याला मंगळवारी रात्री जे.जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. अति तणाव आणि छातीतील संसर्गाचा त्रास त्याला झाला, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती.
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी मंगळवारी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली होती. मात्र, तत्पूर्वीच डोसा मरण पावला. बॉम्बस्फोटात २५७ जण मृत्युमूखी तर ७१३ जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. डोसाचा या प्रकरणात मोठा सहभाग होता.