विक्रोळी : आज झालेल्या वादळी पावसामुळे विक्रोळी कन्नमवार नगर येथे अनेक ठिकाणी नुकसान झाले. पुनर्विकासासाठी गेलेल्या इमारतींच्या भोवती लावले गेलेले पत्रे पडले. झाडे पडण्याच्या ही घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागातील काँग्रेस नेते राहुल वाघधरे यांनी केले आहे.
वादळी वाऱ्याचा पाऊस पडल्यानंतर सामाजिक जबाबदारी म्हणून वाघधरे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. मुसळधार वादळी पावसामुळे विभागात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही विकासकांना सांगून रस्त्यावर पडलेले पत्रे उचलण्याचे काम त्यांनी सुरू केले, असे वाघधरे यांनी सांगितले.