मुंबई : पर्यटन या क्षेत्राला वाहिलेल्या मुसाफिर.कॉम या संकेतस्थळाच्या तिसऱ्या तंत्रज्ञान केंद्राचे पुण्यात उद्घाटन करण्यात आले. १० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक कंपनीने केली आहे.
“सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रवाशांना नावीन्यपूर्ण अनुभवांचा लाभ देणे, हा आमचा मुख्य हेतू आहे, ”असे मुसाफिरचे सहसंस्थापक अल्बर्ट डायस यांनी यावेळी सांगितले.
मुसाफिर.कॉमची ८ शहरांमध्ये १५ कार्यालये आणि ४०० पेक्षा जास्त सदस्यसंख्या आहे. विमानप्रवास, हॉटेल्स बुकींग, सहलींची पॅकेजं आणि ऑनलाइन व्हिसा सेवा कंपनीमार्फत देण्यात येते. २०१८ पर्यंत ऑनलाइन पर्यटनाचे भारतातील प्रमाण ५३ अब्ज डॉलर्स इतके असणार आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने विस्तार करण्यात सुरुवात केली आहे.
“भारतीय बाजारपेठांमध्ये आमचे तंत्रज्ञान जलद गतीने पोहोचावे आणि त्याद्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी,या हेतूने पुण्याचे नवे केंद्र सुरू केले. याचा मुसाफिर.कॉमला नक्कीच फायदा होणार आहे,” असे मुसाफिरचे ग्रूप सीईओ राजेश पारीक यांनी सांगितले.
तंत्रज्ञान आणि उत्पादन टीमवर आधारीत पुणे केंद्रामुळे कंपनीच्या वेब आणि मोबाइल अॅप्लिकेशनच्या विस्ताराला चालना मिळण्यास मदत होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.