मालाड, ता.१३(निसार अली) : काँग्रेस कार्यकर्ते आणि समाजासाठी सतत धडपडणारे मुरगन गणेश पिल्लई यांची काँग्रेस स्लम सेलच्या मालाड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
मुरगन गणेश पिल्लई हे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यामुळे दिनांक 12 डिसेंबर रोजी, मुंबई चे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांच्या मालवणीतील कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रसंगी मुंबई काँग्रेस सचिन संतोष चिकणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुरगन पिल्लई यांच्या नियुक्तीने काँग्रेसला जनाधार वाढवण्यासाठी मदत होणार आहे.















