रत्नागिरी, (आरकेजी) : सरकारकडून मिळालेल्या घरकुल योजनेतील घर मिळण्यासाठी सख्ख्या चुलत भावाची हत्या करणार्या दत्ताराम चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. चव्हाण हा राजापूर तालुक्यातील सौंदळ गावातील रहिवासी आहे. सप्टेंबर 2015 मध्ये ही घटना घडली होती.
दत्ताराम चव्हाण याला सरकारी योजनेतील घर मिळाले नाही. याचा राग त्याच्या मनात होता. चुलत भाऊ चंद्रकांतचा भाल्यासारख्या हत्याराचा वापर करत त्याने खून केला होता. राजापूर पोलिसांनी दत्तारामला अटक केली होती. खून केल्याची कबुलीही त्याने दिली होती. आज त्याला गुन्ह्याची शिक्षा मिळाली.