डोक्यात दगड घालून
पुतण्याने चुलता- चुलतीला संपवले
रत्नागिरी : जमिन व घराच्या वादातून पुतण्याने चुलता आणि चुलतीच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील व्हेळ गावात शनिवारी घडली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चुलता आणि पुतण्या हे दोघे एकाच घरात मात्र वेगवेगळ्या खोल्यात राहतात अधून मधून जागा जमीन व घरावरून या दोघांमध्ये खटके उडत असत. शनिवारी सकाळी चुलता आणि चुलती गुरे गोठ्यात बांधून घरी येत असतानाच पुतण्याने भांडण काढून वाद घालायला सुरवात केली. त्यानंतर हाणामारी करून संतापलेल्या पुतण्याने भलामोठा दगड आपल्या चुलत्याच्या डोक्यात घालून निर्घृण खून केला, तर सोडवण्यासाठी आलेल्या चुलतीला ढकलून लावल्याने ती जवळच असलेल्या बांधावर पटल्याने तिच्या डोक्याला इजा झाल्याने ही दोघं जागीच मृत पावली आहेत. या घटनेतील संशयित आरोपी प्रतीक चंद्रकांत शिगम (२२)याने संतापाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे चुलता एकनाथ धकटु शिगम (६०)आणि चुलती वनिता एकनाथ शिगम (५४) या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. क्रूरतेने भला मोठा दगड आणून आपल्या चुलत्याचा डोक्यात घातल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला असून चुलती बांधावर पटल्याने तिच्या डोक्याला इजा जरी झाली नसली तरी अंतर्गर डोक्यात जबर मार लागल्याने या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकनाथ शिगम आपल्या पत्नी आणि मुली सोबत व्हेळ साडेवाडीत राहत होतो गेल्या वर्षभरा पूर्वीच आपल्या आई वडिलांना मुंबईतून सोडून त्याचा ठिकाणी राहू लागला होता. थोडे दिवस व्यवस्थित राहिला, त्यानंतर त्याला दारुचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो अधून मधून या दाम्पत्य सोबत जमीन जाग्यावरून वाद घालत असे. परंतु तो एवढा टोकाला जाईल आणि अशी घटना घडेल याची थोडी देखील कल्पना या दाम्पत्याला आली नाही. आज ना उद्या समजेल लहान आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले . त्यामुळे त्यांनी याची कोठेही त्याची तक्रार केली नव्हती.
सकाळी ही घटना घडल्याची माहिती गावात कळताच व्हेळ गावचे पोलीस पाटील नसल्याने जवळच्या आरगाव पोलीस पाटील यांनी याची खबर लांजा पोलिसांना देताच लांजा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपी प्रतीक शिगम याला ताब्यात घेतले .त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले आहे
घटनेचे गांभीर्य बघून लांजा राजापूर उप विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील यांच्या सह स्थानिक गुंन्हा अन्वेषण अधिकारी यांच्या सह लांजा पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील ,रेखा जाधव यांच्या सह लांजा पोलीस घटनास्थळी हजार होते. सदरच्या घटनेचे वृत्त या परिसरात पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली हा हा म्हणता शेकडो ग्रामस्थ घनस्थळी जमा झाले होते अनेकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली
प्रतीक शिगम हा दारूच्या नशेत कधीना कधी गावातील लोकांशी देखील वाद घालत असल्याने व्हेळ गावातील ग्रामस्थांच्या त्याच्या बद्दल अगोदर पासूनच संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे त्याने केलेल्या कृत्यामुळे ग्रामस्थांत अधिक संताप व्यक्त केला जात आहे
दुपारी दोन्ही मृतदेहाचे पंचनामे केल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भांबेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाडण्यात आले सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात करण्यात येईल
या घटनेचा अधिक तपास लांजा पोलिसांसह रत्नागिरीचे स्थानिक गुन्हा अन्वेषण अधिकारी अधिक करीत आहेत.