मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या(ता.२३) सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतरच प्रत्यक्षात निकाल हाती येऊन कोण बाजी मारेल, ते स्पष्ट होईल. महापालिकेच्या २३ केंद्रावर एकाचवेळी मतमोजणी सुरु होईल. दुपारी तीन पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. २२७ जागांसाठी ही निवडणूक झाली आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतमोजणीसाठी ७२९ टेबल मांडण्यात येणार आहेत. अंधेरी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक १३ प्रभागांची मतमोजणी होईल, त्यासाठी तेथे ९१ टेबल असणार आहेत. मालाड येथील केंद्रावर ४८ टेबल असतील. आझादमैदान, नागपाडा, ना. म. जोशी मार्ग, काळाचौकी, सायन, दादर, नेहरुनगर, देवनार, चेंबूर, पार्कसाईट, मुलुंड, पंतनगर, वाकोला, वांद्रे, आंबोळी, अंधेरी, साकीनाका, मालाड, दहिसर, बोरीवली, कांदीवली, गोरेगांव आणि दिंडोशी आदी २३ मतदान केंद्रावर मतमोजणी होईल.केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मतमोजणीच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल केले गेले आहेत. मतदान केंद्र असलेल्या काही परिसरात वाहनांना पार्किंग करण्यास देखील बंदी आहे.

कुर्ल्याचा निकाल पहिला?
कुर्ला पश्चिम येथे सर्वात कमी १० टेबल लावण्यात येणार आहेत. ८ प्रभागांची मतमोजणी येथे होणार आहे. त्यामुळे कुर्ल्याचा निकाल पहिला येऊ शकतो. अंधेरीतील मतदान केंद्रावर सर्वाधिक ९१ टेबल आहेत. १३ वॉर्डांची मतमोजणी येथे होईल. त्यामुळे अंधेरीतील मतदानाचा निकाल सगळ्यात उशिरा येण्याची शक्यता आहे.