मुंबई : कोरोनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य करणार्या पत्रकारांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईतील तब्बल ५३ पत्रकारांना कोरोना झाला. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पत्रकार संघाने मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्यासाठी कोरोना चाचणीसाठी शिबीर घेतले होते. यावेळी१६८ जणांची चाचणी करण्यात आली. अहवालानुसार ५३ जणांना संसर्ग झाला आहे. यापैकी अनेक पत्रकार इलेक्ट्रॉनिक, वेब आणि प्रिंट मिडीयातील आहेत.