रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे पोलीस ठाण्यासमोर मोठा वृक्ष कोसळल्याची घटना आज रविवारी घडली. त्यामुळे सावर्डे ते आगवे पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सुट्ट्याचा हंगाम असल्याने कोकणात फिरायला येणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महामार्गावर चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. झाड पडल्यानंतर अवघ्या काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर काही वेळातच हे झाड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.