मुंबई, (निसार अली) : ओपन नॅशनल मास्टर चॅलेंज चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी झाली. या स्पर्धेत 18 वर्षांच्या वरील वयोगटात मुंबईच्या कराटेपटूंनी यश मिळवले. पहिला क्रमांक मोहन भांडारी ने तर दुसरा क्रमांक यश शिंदे याने मिळवला. विजेत्यांना चषक आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यश शिंदे याने यापूर्वीही चांगली कामगिरी करत अनेक स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत.