मुंबई : मुंबईतल्या काळी पिवळी टॅक्सीचालकांसाठी ओला व उबेरच्या धर्तीवर एक अॅप लवकरच तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंबईतील टॅक्सी चालकांसाठी अॅप तयार करण्याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत फडणवीस म्हणाले की, ओला व उबेर या कंपन्यांचे स्वतःचे स्वतंत्र अॅप आहे. या माध्यमातून टॅक्सी कुठे आहे, हे कळते. या धर्तीवर काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी अॅप तयार करण्यात येईल. येत्या तीन महिन्यात याविषयी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील