मुंबई : मागील वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस झाल्याने यंदा मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार राहणार नाही. त्यामुळे पाण्याची चिंता मिटणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठी शिल्लक आहे. पाणीसाठा शिल्लक असला तरी पाण्याच्या अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
या आधी सन २०१५ ला अपुरा पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईकरांवर १५ टक्के पाणीकपातीची वेळ आली होती. तसेच व्यावसायिक वापरासाठीची कपात तर ५० टक्के होती. सन २०१६ मध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने पालिकेने वर्षभर पाणीकपात केली नाही. १० मे २०१७ पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सुमारे तीन लाख ९३ हजार ८३१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पुरेल.
चौकट
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा – १७९७०
मोडकसागर – ७२८६२
तानसा – ४४९९८
मध्य वैतरणा – ७३६३७
भातसा – १७२७०५
विहार – ८५८६
तुळशी – ३०७२