
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी नऊ मार्च ही तारीख जाहीर झाली होती. परंतु आज अचानक तारीख बदलली गेली आणि आठ मार्च अशी केली गेली. आता यादिवशीच महापौरांची निवड होणार आहे. महापालिका आयुक्तांनी अचानक आदेश दिला आणि तारीख बदलण्यात आली.
महापौरपदासाठी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी ४ मार्च हा दिवस आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी त्यांना काही तास आधी अर्ज मागे घेता येईल.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना – ८४+ ४ अपक्ष
भाजप – ८२
काँग्रेस – ३१
राष्ट्रवादी – ०९
मनसे – ०७
एमआयएम – ०२
सपा – ०६
अखिल भारतीय सेना – ०१















