रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा दर्गा येथे कंटेनर ४० फुट खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यु झाला. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हातखंबा दर्गा येथील अवघड वळणावर हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी चालक अरूणकुमार बाळकृष्ण शर्मा (५०, रा. राजस्थान) याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान चालकाचा मृत्यु झाला. अरूणकुमार शर्मा हा कंटेनर (क्र. आरजे-२३-बीजी-१०५८) घेऊन गोवा ते अहमदाबाद असा प्रवास करीत होता. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कंटेनर हातखंबा दर्गा येथे आला असता चालक अरूणकुमार शर्मा याचे कंटेरनवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेला कंटेनर रस्त्याच्या बाजुला असलेल्या दरीत कोसळला. तब्बल ४० फुट खोल दरीत जाऊन कंटेनर कोसळल. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि हातखंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ४० फुट खोल दरीत कोसळल्याने कंटेनरचे मोठे नुकसान झाले तर कंटेनर चालक अरूणकुमार शर्मा कंटेनरमध्ये फसला होता. त्याला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. गभीर अवस्थेतील चालक शर्मा याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होते.