रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातल्या ओणी कासारवाडीजवळ मोठा वृक्ष कोसळला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी आणि गोव्याच्या दिशेने जाणारी अशी दोन्ही बाजूकडची वाहतूक एक तास ठप्प झाली. परिणामी २ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास हि घटना घडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने झाड हटवण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरु झाली.