रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई गोवा महामार्गावर तीन वाहनांमध्ये आज दुपारी विचित्र अपघात झाला. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले. संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा इथे अपघात घडला.
कुरधुंडा बस स्टॉप जवळ चिपळूणच्या दिशेकडे रत्नागिरी-चिपळूण एसटी बस थांबली होती. यचवेळी एसटीच्या मागे वेगनॉर कार थांबली होती. या कारला भरधाव मालवाहू ट्रकने पाठिमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती कार थेट एसटीच्या चाकाकडील भागात घुसली. या दुर्घटनेत कारमधील सचिन गुरव आणि स्वप्नील गुरव (दोघेही राहणार तळवडे, तालुका राजापूर) जखमी झाले.