![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2018/09/accident-768x1024.jpg)
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेडजवळ इको गाडी आणि आराम बस यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. गणेशोत्सवासाठी खाजगी गाडीतून उपळकर आणि माजळकर या दोन कुटुंबांतील सदस्य आपल्या राजापूर तालुक्यातील कोंडये या गावी जात होते. या गाडीतून एकूण ११ प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात साडेअकराच्या सुमारास घडला . इको गाडी महामार्गावरील वाकेड इथं आली असता गोव्याकडून येणाऱ्या खासगी बसला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली. समोरासमोर बसलेली हि धडक एवढी भीषण होती, कि इको गाडीतील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला तसेच एका बालकाचा समावेश आहे. प्रियांका काशिराम उपळकर – २९ वर्ष, पंकज हेमंत घाणेकर – १९ वर्ष, भार्गवी हनुमंत माजलकर – अंदाजे ६ महिने, मानसी हनुमंत माजलकर – ३० वर्ष, तसेच आणखी एका पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर जखमीमध्ये मंगेश काशीराम उपळकर – 26 वर्ष, लहू काशीराम उपळकर – १८ वर्ष, अंकुश काशीराम उपळकर – १८वर्ष, हनुमंत शंकर माजळकर – ३५ वर्ष, नितीन शांताराम जाधव – ३४ वर्ष (आराम बस चालक), संदेश शंकर कांबळे – २१ वर्ष, प्रमोद प्रभाकर माजळकर यांचा समावेश आहे. रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.