रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील विनती कंपनीजवळ एसटी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सौरभ सुतार(वय-१८) जागीच ठार झाला. सौरभ सोनगाव घागवाडी येथे राहाणारा होता.
एका आईस्क्रीमच्या दुकानात कामाला असणारा सौरभ आज सकाळी कामानिमित्त लोटे इथे आला होता. काम संपवून तो दुचाकीवरून जात असताना एका अवघड वळणावर चिपळूण- मुंबई एसटी आणि त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. सौरभच्या अपघाती मृत्यूमुळे सुतार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.