रत्नागिरी (आरकेजी): मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात हा भीषण अपघात झाला. प्रदिप पिलणकर आणि रोहित मांडवकर अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन फोर व्हिलर यांची समोरासमोर हा अपघात झाला.
प्रदिप पिलणकर हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आहे. हा जिल्हा रुग्णालयात इलेक्ट्रिशन म्हणुन कामाला होता. तर रोहित मांडवकर हा जिल्हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. या दोघांची बदली सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओरस इथं झाली होती. त्यामुळे रत्नागिरीतून हे कर्मचारी ओरस इथं हजर होण्यासाठी चालले होते. वाकेड घाटात यांच्या इटीऑस गाडीची आणि झायलो गाडीची समोरासमोर धडक झाली. हि धडक एवढी जबरदस्त होती कि प्रदिप यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. या दोघांना लांजा ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच या दोघांची प्राणज्योत माळवली होती. रोहित यांचे वडिल सुद्धा ३१ मे रो जिल्हा शासकीय रुग्णालयातून निवृत्त झाले होते. रोहित हा त्यांच्या वडिलांचा एकुलता एेक मुलगा होता. अ्पघाताचे वृत्त कळताच जिल्हा शल्यचिकित्सकांनी अपघात स्थळाला भेट दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.