रत्नागिरी (आरकेजी): मुंबई गोवा माहामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये १ जण ठार, तर ५ जण जखमी झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीजवळ कंटेनर आणि टेम्पोमध्ये हा अपघात झाला. रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला.
मुंबईवरून लांजा येथे येणारा टेम्पो आणि मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनरवर यांच्यामध्ये झालेला हा अपघात एवढा भीषण होता, कि यामध्ये १ प्रवासी जागीच ठार झाला. प्रकाश गुणाजी जाधव (मुळ राहणारे देवरुख, सध्या.मुंबई) हे या अपघातात मयत झाले आहेत. तर विशाल गणपत अवसरे(मुळ राहणारे पालू-लांजा, सध्या मुंबई), मनोज मनोहर जाधव (अंधेरी, मुंबई), प्रवीण चंद्रकांत नामे (पालू-लांजा), मयांक योगेश जाधव (मुळ राहणारे देवरुख, सध्या.मुंबई), महेश गंगाराम खाके (पालू-लांजा, सध्या मालाड मुंबई) हे पाच जण जखमी झाले आहेत.