रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज पहाटे एक खासगी बस पलटी होऊन झालेल्या भीषण अपघात झाला. त्यात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २१ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकाडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्गावरील सावर्डे जवळील आगवे वळणावर अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने विशाल ट्रॅव्हल्सची बस निघाली. आगवे वळणावर चालकाचा गाडीवरून ताबा सुटून बस रस्त्यात पलटली.
सावर्डे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या डेरवण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्व प्रवासी मुंबईहून मालवणला जात होते.