मुंबई, 20 ऑगस्ट : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील चर्चगेट स्थानकाजवळील कूपरेज मैदान येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री व हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली व अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे राज्यमंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, भाई जगताप, काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मधू चव्हाण, सुरेश शेट्टी, चरणसिंग सप्रा, बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव भावना जैन, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मुंबई काँग्रेसचे समन्वयक राजेश भाई ठक्कर, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.