नागपूर : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून देशाच्या व राज्याच्या विकासासाठी असे प्रकल्प उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, बुलेट ट्रेनसाठी ठाणे व पालघरमधील जी जमीन संपादित केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. काही ठिकाणी ही ट्रेन भूमिगत आहे. शेतकऱ्यांची व ग्रामसभेची सहमती घेण्यासाठी जन सुनावणी सुरु आहे. जन सुनावणीद्वारे सल्ला