मुंबई : ज्या वातानुकूलीत बससेवेने बेस्टला आर्थिक संकटात लोटले ती सेवा १७ एप्रिलपासून खंडित करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे वातानुकूलीत सेवेला प्राधान्य देणार्या प्रवाशांना नैसर्गिक वार्यासह बेस्टचा प्रवास करावा लागणार आहे.
बेस्टची वातानुकूलीत सेवा नवी मुंबई, ठाणे पर्यंत धावत आहे. परंतु, ही सेवा चालवण्यास बेस्ट प्रशासन अपयशी ठरले. या सेवेचे तिकीटदर महाग असल्याने सामान्य प्रवासी तिथे फिरकत नव्हता. त्यामुळे बेस्टने या सेवेचे दर अर्ध्यावरच आणले होते. तरिही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नव्हता. दररोजचा तोटा भरून काढणे प्रशासनाला अशक्य झाले होते. अखेर ही सेवा खंडित करण्यात आली आहे.
वातानुकूलीत बसपासधारक प्रवासी साध्या तसेच मर्यादीत बसगाड्यांमधून प्रवास करू शकतील किंवा बसपासाच्या उर्वरित रकमेचा योग्य तो परतावा उपक्रमाकडून प्राप्त करू शकतील, असे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.