मुंबई : मुंबईत २४ तासांत कोरोनाचे ५७ नवीन रुग्ण आढळले. आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची संख्या ३४ झाली आहे. रुग्णांची संख्या ४९० वर पोहचली
आज १५० जणांची कोरोना चाचणी केली गेली. ५७ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. गेल्या पाच दिवसांत तब्बल ५९ जण कोरोनामुक्त झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत १० हजार ९६८ क्वारंटाईन क्षेत्र घोषित केले गेले. त्यापैकी ३,९९० ठिकाणी प्रवेश प्रतिबंधीत आहे. सीसीटीव्ही, पालिकेचा वॉर रूम आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.