मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. विधी विभाग प्रमुख प्रा. डॉ.राजेश्री वर्हाडी यांच्यासह अलका पाटील, दीपाली पाटील, डॉ. संजय जाधव, डॉ. शितल सेठिया आदी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.
महिला प्राध्यापक आणि विद्यार्थीनी यांना गुलाब पुष्प देण्यात आले. प्रा. डॉ. राजेश्री वर्हाडी, महिला प्राध्यापक आणि विद्यार्थी आदींनी केक कापून महिला दिवस साजरा केला. राजेश्री वर्हाडी यांना विद्यार्थांनी रोप भेट दिले. एलएलएमच्या पर्यावरण या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उदय गायकवाड, राजहंस गायकवाड, संदीप भोईर, मोहन जाधव आणि आम्रपाली मगरे यावेळी उपस्थित होते.