मुलुंड, (शेखर भोसले) : भारतीय स्वा
तंत्र्य दिन मुलुंडमध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. तर मुलुंड पश्चिमेत आणि पूर्वेत अश्या दोन ठिकाणी नेहमीप्रमाणे यंदाही रात्री १२ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

मुलुंड पश्चिमेला नाहूर रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यरात्री ठीक १२ वाजता ‘ माझी ५ मिनिटे, माझ्या राष्ट्रगीतासाठी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर ठिकाणी राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. पक्षाचे नेते अमित ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पक्षाचे दुसरे नेते मा. आमदार बाळा नांदगावकर यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण झाले, तर शिरीष सावंत यांच्या हस्ते अमर जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रतिष्ठितांचा सत्कार आयोजक मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सुरेख सोहळ्याला पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, उपाध्यक्ष भाई जुवळे, सत्यवान दळवी, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सागर देवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते. हाती राष्ट्रध्वज घेतलेल्या गोविंदाने, सात थरांच्या दहीहंडीवर सर होत वरती जावून तिरंगा फडकवला, हे येथे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
तर दुसरीकडे, मुलुंड पूर्व येथे रविवार दिनांक १४ ऑगष्ट मध्यरात्री बरोबर १२ वाजता संभाजी मैदानात देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम मा. आमदार शिशिर शिंदे यानी आयोजित केला होता. यावेळी मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या हस्ते भारतीय लष्कर प़मुख स्व. बिपीनकुमार रावत यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले तर कोवीड काळातील टास्कफोर्स प्रमुख व विख्यात सर्जन डॉ. संजय ओक यांच्या शुभहस्ते ठीक १२ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी शिशिर शिंदे यांच्या हस्ते डॉ. संजय ओक यांचा तसेच रमेश शिर्के यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.