
मुंबई : मुलुंडमधील 7500 घरांच्या PAP प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेल्या रहिवाशांनी 28 जुलै रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
हा प्रकल्प मुलुंडच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षितता यावर घाला आहे; असे मत व्यक्त करण्यात आले. या संभाव्य प्रकल्पाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
धर्मराज्य पक्षाचे कामगार नेते राजन राजे, कामगार नेते विश्वास उदगी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं. 7500 घरांचा प्रकल्प मुलुंडमध्ये होणार नाही, बाहेरून लोक येणार नाही, आम्ही वकीलपत्र घेऊ, आमचे मंत्री सह्या करतील आणि प्रकल्प थांबेल अश्या खोट्या आश्वासने लोकसभेत अनेक नेत्यांनी दिली. त्यांची आठवण आज करून देणे गरजेचं आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलन शांतपणे झालं असलं तरी या पुढचं आंदोलन आक्रमक पणे करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पात येणाऱ्या नागरिकांची यादी तयार नाही, कोण येणार याची स्पष्टता नाही त्यामुळे हा प्रकल्प एक घोटाळा आहे, असा आरोप करण्यात आला.
यामध्ये ज्या लोकांना घरे दिले जाणार त्यांची पात्रता निकष हे R and R policy नुसार आहे, या policy नुसार प्रकल्प पारीत होताना जी घरे आहेत ती ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी कधीच संपणार नाही. मुलुंडला आधी डम्पिंग ग्राऊंड आता PAP मग धारावी प्रकल्प असे अनेक प्रकल्प लादले जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असे ऍड. सागर देवरे यांनी सांगितले.















