मुलुंड : मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटाला दिवसेंदिवस कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून वाढता विरोध होत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन होऊच द्यायचे नाही, असा पणच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आणीबाणीवर आधारीत असणार्या या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे. आज सोमवारी मुलुंड पश्चिम रेल्वे स्था बाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू सरकारचे पोस्टर्स जाळले आणि चित्रपटगृह मालकांनी हा सिनेमा प्रदर्शीत करू नये, असे आवाहन केले आहे. तसे न केल्यास चित्रपटाचे खेळ रोखू, असा इशाराही देण्यात आला आहे. ईशान्य मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले.