‘स्त्री’ ने तिच्याविषयी व्यक्त व्हावे. स्वत:च्या संकल्पना विचार माडावे, यासाठी स्त्री च्या अंतर्मनाचा शोध लवकरच माय एफएमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यासाठी ‘द मुक्ता बर्वे शो’ या कार्यक्रमांतर्गत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हा कार्यक्रम करणार आहे.
सेलिब्रिटीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा माय एफ एम रेडियो वाहिनीचा हा पहिलाच प्रयोग आहे. दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ वाजता मुक्ताच्या आवाजातला हा शो पश्चिम महाराष्ट्रात सुरु होत आहे.
मुक्ता बर्वे या कार्यक्रमाला चांगला न्याय देऊ शकेल, असा विश्वास माय एफएम ला आहे. जीसिम्स्चे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरान हे
देखील या शोसाठी उत्सुक आहे. ‘एफएम मधून हा आगळावेगळा उपक्रम आम्ही राबवीत आहोत, यातून स्त्री विकासाचे अनेक पैलू मांडले जातील’ असे त्यांनी सांगितले.
गंभीर आणि सामाजिक विषयावर आधारित अनेक चित्रपटातून नावारूपास आलेली मुक्त आज यशाच्या उंचीवर आहे, आपल्या भूमिकेतून स्त्री विषयपर अनेक समस्यांना तीने वाचा फोडली आहे. ती आता प्रथमच एमएमच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवाद साधणार आहे.