मुंबई : शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आदरांजली वाहिली. यावेळी आमदार राजेश ऊर्फ बाळा काशिवार, अपर मुख्य सचिव (सेवा) भगवान सहाय यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांनी हुतात्म्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकजण हुतात्मा झाले. जुलमी ब्रिटीश सरकारशी सशस्त्र क्रांती करणारे म्हणून शहिद भगतसिंग, हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांचे आदराने घेतल जाते. इंग्रज सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. लाहोर येथील तुरुंगात ते हसत हसत फासावर गेले. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो.