मुंबई : रमझान ईद (ईद-उल-फितर) निमित्त राज्यातील मुस्लिम बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रमझान ईद हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. माणसा-माणसांतील स्नेहभाव व्यक्त करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.