रत्नागिरी, (आरकेजी) : साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातला. चिपळूण तालुक्यातील कामथे रुग्णालयात हा प्रकार घडला. वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.तालुक्यातीलअलोरे येथील झरीना आप्पासाहेब नायकवडे या महिलेला काल संध्याकाळी सर्पदंश झाला. तिला उपचारांसाठी नातेवाईकांनी कामथे येथील रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर न पोहचल्याने तिचा मृत्यू झाला. असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आणि रुग्णालयात गोंधळ घातला. घटना कळताच चिपळूणातील शिवसेना कार्यकर्त्यानी कामथे रुग्णालयाला घेराव घातला. पोलिसाना माहिती मिळताच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.















