मालाड, ता.24 (वार्ताहर) : गोरेगाव पुर्व नागरी निवारा परिषद वसाहतीमध्ये नागरीकांच्या वतीने नागरी निवारा परिषद स्मृती स्थळ, झोन 2येथील शिल्पाला हार व मानवंदना देऊन ज्येष्ठ समाजवादी नेत्या व महाराष्ट्राच्या माजी विरोधी पक्ष नेत्या मृणालताई गोरे यांची 94 वी जयंती साजरी करण्यात आली. मृणाल गोरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सर्व सामान्यांच्या राहण्यासाठी नागरी निवारा परिषदे च्या माध्यमातून 6 हजाराहून अधिक घरांची वसाहत येथे निर्माण झाली.
पुढील महिन्यात त्यांची पुण्यतिथीही आहे. या दरम्यान काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असे संदिप सावंत यांनी सांगितली. नागरी निवारा परिषदमधील गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व रहीवाशी यावेळी उपस्थित होते.















