पणजी : अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना 12व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सव (जीएमएफएफ) 2019 यामध्ये गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जून 28-30, 2019 या कालावधीत होत असणाऱ्या तीन दिवसांच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मृणाल कुलकर्णी यांना गोदरेज इंडस्ट्रीज लि.चे एडिबल ऑइल्सचे एव्हीपी शेखर सुर्वे यांच्या हस्तेगोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्कार देण्यात आला.
12वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव हा तीन दिवसांचा महोत्सव असून, त्यामध्ये विविध चित्रपटांचे स्क्रीनिंग, रात्रीचे जेवण, दिग्गजांचा सन्मान व लाइव्ह परफॉर्मन्स यांची रेलचेल आहे. या वर्षी, गोदरेज व्हेज ऑइल हे उत्तम व्यासपीठ असून त्याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणवत्तेला संधी दिली जाते. गोदरेज व्हेज ऑइल हे आवश्यक पोषणमूल्ये असणारे दर्जेदार तेल आहे व त्यामुळे हे तेल संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्यदायी ठरते. मराठी सिनेमामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, तसेच कुटुंब व समाज यांच्या आरोग्य व फिटनेसला चालना देण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या हेतूनेगोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्काराचा समावेश करण्यात आला.
मृणाल या लोकप्रिय अभिनेत्री व दिग्दर्शिका असून त्यांनी मराठी व हिंदी या दोन्ही मनोरंजन उद्योगांमध्ये काम केले आहे. मृणाल या अभिनेता-लेखक विराजस कुलकर्णी यांच्या आईही आहेत. मृणाल महिलांसाठी करिअरविषयक जागृती करणाऱ्या अभियानासाठी आणि कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या बालकांसाठी दातार जेनेटिक्सची ब्रँड अम्बेसेडर म्हणून व ‘कॅन कनेक्ट‘ या स्वतःच्या उपक्रमाद्वारे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. म्हणूनच, मृणाल यांनी व्यावसायिक व वैयक्तिक पद्धतीने हाती घेतलेल्या कामासाठी त्यांना गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना मृणाल कुलकर्णी यांनी म्हटले, “गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्या करिअरमध्ये मराठी सिनेमाचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. माझ्या कामाद्वारे या क्षेत्राची गुणवत्ता वाढवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे.केवळ माझ्या कुटुंबासाठी नाही, तर बाकी लोकांसाठीही आरोग्य व फिटनेस यासाठी मी उपक्रम आयोजित करते. मराठी चित्रपट क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात प्रेक्षकांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.”
गोवा मराठी चित्रपट महोत्सवासोबतच्या सहयोगाविषयी बोलताना, गोदरेज इंडस्ट्रीज लि.चे एडिबल ऑइल्सचे एव्हीपी शेखर सुर्वे यांनी सांगितले, “संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगासाठी मोठे व्यासपीठ असणाऱ्या 12व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पाठिंबा देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एक ब्रँड म्हणून, गोदरेज व्हेज ऑइल प्रत्येक कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी दर्जेदार उत्पादने देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे, आम्ही गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्कार सुरू करून आमचा सहयोग आणखी अर्थपूर्ण केला. हा पुरस्कार आमच्या मूल्यांशी तंतोतंत जुळणारा आहे. या पुरस्काराबद्दल मृणाल कुलकर्णी यांचे अभिनंदन. चित्रपटसृष्टीमधये आणि आरोग्याच्या क्षेत्रात चांगले काम असेच सुरू ठेवण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा.”
120 हून अधिक वर्षे, गोदरेज हा देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडपैकी एक आहे आणि चार दशकांहून अधिक काळ तेल व्यवसायात आहे. गोदरेज ऑइल गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे आणि मानवाच्या शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक आवश्यक पोषणमूल्ये त्यातून दिली जातात. तेलांवर विशेष प्रक्रिया केली जाते आणि ऑटोमेटेड उत्पादन व्यवस्थेमध्ये पॅक केले जाते. त्यामुळे तेलाचे पाकिट उघडेपर्यंत त्यास मनुष्याच्या हाताचा स्पर्श होत नाही.