दिल्ली : कोकण रेल्वे मार्गावरील वसई रोड रेल्वे स्टेशन (महाराष्ट्र) आणि सावंतवाडी, सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन सुरू करण्यात यावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्णपणे विकसित करावे, यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली.
सदरहू भेटीदरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील खासदार श्री. विनायक राऊत यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच संबंधित अधिकारी यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.