मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे शिवसेनेचे भांडुपचे उमेदवार रमेश कोरगावकर यांना अखिल भांडुप व्यापारी मित्र मंडळाने पाठिंबा दिला आहे. व्यापा-यांच्या पाठिंब्यामुळे रमेश कोरगावकर यांची ताकद वाढली असून त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. व्यापा-यांनी रमेश कोरगावकर यांना पाठिंबा द्यावा यासाठी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी मेहनत घेतली. भांडुप येथील जगन्नाथ बॅन्केट हॉल या ठिकाणी आज झालेल्या एका कार्यक्रमात व्यापारी मंडळाने पाठिंबा दिला.
भांडुप विधानसभेतुन महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार रमेश कोरगावकर तर शिवसेना शिंदेगटाचे अशोक पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. विद्यमान आमदार रमेश कोरगावकर यांनी गेल्या पाच वर्षात भांडुप मध्ये केलेला विकास पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. भांडुप मधील टेकडी भागात पाणी पुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यावर खासदार संजय दिना पाटील यांच्या मदतीने हा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे. तसेच संरक्षक भिंत, वाहतुकीचा प्रश्न, शौचालयाचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून अनेक ठिकाणी आजही काम चालू असल्याचे रमेश कोरगावकर यांनी सांगितले. त्यांच्या विकास कामांना पाहता अखिल भांडुप व्यापारी मित्र मंडळाने त्यांना पाठिंबा दिला आहे. खा. संजय दिना पाटील तसेच राजोल संजय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून आपला विजय निश्चित असल्याचे रमेश कोरगावकर यांनी भांडुप येथील जगन्नाथ बॅन्केट हॉल मध्ये झालेल्या आजच्या कार्यक्रमात सांगितले.