रत्नागिरी : इंडिया आघाडीचं 48 जागांपैकी बहुतेक जागांवर एकमत झालेलं आहे, एकदोन जागा चर्चेसाठी आहेत, त्यावरही तोडगा निघेल आणि आम्हाला चांगलं यश मिळेल असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे, तसेच या दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील असं देखील ते यावेळी म्हणाले. ते बुधवारी रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यावं अशी आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे, त्यांचा सन्मान होईल अशा जागा त्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे इंडिया आघाडीमधूनच प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान होईल असं राऊत यावेळी म्हणाले.
प्रत्येक निवडणूक आली की मनसेची कोणानाकोणा बरोबर सेटिंग चालू असते अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी यावेळी केली. तसेच स्वतःचा आमदार, खासदार, नगरसेवक निवडून आणण्याची इच्छा मनसे प्रमुखांकडे आहे असं कधीही वाटलं नाही. उद्धव ठाकरे यांचा द्वेष म्हणून त्यांना टक्कर देण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची हा त्यांचा आजपर्यंतचा धंदा आहे. पण आता लोकं त्यांना ओळखून आहेत, या निवडणुकीत त्यांचं पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांचे जे पक्षप्रमुख करताहेत ते चुकीचं आहे असं राऊत यावेळी म्हणाले.
भाजपचा स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास तसेच मोदीजिच्या गॅरेंटीवरचा विश्वास उडालेला आहे, म्हणून इकडचे तिकडचे गोळा करत आपली पोळी भाजण्याचं काम सुरू आहे अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी यावेळी केली. बारामतीमध्ये सुप्रिया ताईंचा विजय 100 टक्के निश्चित झालेला आहे असं देखील ते यावेळी म्हणाले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमीत कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार ते शोधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघात आले तरी इथला त्यांचा उमेदवार पडणार आहे. उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय आहेत ते मी काय सध्या पाहिलेले नाहीत. हौशे गौशे नाचताहेत त्याचा विचार आम्हाला करायची गरज नाही, आम्हाला कोकणवासीयांचा मिळाला आहे आणि भविष्यातही मिळेल. नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक निश्चित आहे. या मतदारसंघात निवडणूक लढवणे, जिंकणे नव्हे हा भाजपचाच न्याय आहे, बाकीचे आयत्या बिळातले नागोबा आहेत, आईतखाऊ वृत्तीला धडा शिकविण्याचे काम इथले मतदार करतील अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.