
रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीत 24 एप्रिलला येत आहेत, याचाच अर्थ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे, असं इंडिया आघाडीचे या मतदारसंघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी म्हणत महायुतीला टोला लगावला आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या दोन सभा होऊन देखील भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता.
यावेळी अमित शहा जरी येत असले तरी कोकण हा बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा कोकण आहे, त्यामध्ये कोणीही दुरावा निर्माण करु शकणार नाही.
दरम्यान महायुतीच्या दोन्ही इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज घेतले आहेत, याबाबत बोलताना खा. राऊत म्हणाले की, मला फार काही याबाबत भाष्य करायचं नाही, एक विनोद चालला आहे, थट्टामस्करी चालली आहे राजकारणाची. अशी अवेहलना का होतेय याचा विचार दोघांनी करावा असा टोला यावेळी राऊत यांनी नारायण राणे आणि किरण सामंत यांना लगावला.